MPY ब्लॉग विषयी थोडेसे
शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे म्हणजे इ.१० वी व इ. १२ वी च्या परीक्षा.विद्यार्थ्यांच्या भावी कारकिर्दीला वळण देणाऱ्या या परीक्षांबद्दल अनेक समज गैरसमज जनमानसात तयार झालेले आहेत.त्यातच सन २०२०/२१ या वर्षात कोविड-१९ मुळे शालेय शिक्षणाची वाताहत झाली.इ १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीत परीक्षेची तयारी कशी करता येईल याचे विचारमंथन सुरू झाले व आखणी झाली *१००दिवसात १० वी* या कार्यक्रमाची.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकांमधून असाही विचार पुढे आला की विद्यार्थ्यांना सार्वत्रिक परीक्षा,शालेय काळातील स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात कायमस्वरूपी मार्गदर्शन होणेसाठी एका ई-विचारपीठाची स्थापना करता येईल का? सकारात्मक विचारांना चालना मिळाली व त्यातून निर्मिती झाली MPY Learning Community या ब्लॉगची.
सदर कार्यक्रमाची आखणी ,अंमलबजावणी करण्यासाठी तीन संस्थांनी पुढाकार घेतला.त्यात महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ( M ),पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्य शाळा मुख्याध्यापक संघ( P )आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चा शिक्षण विकास मंच( Y )यांनी.
या ब्लॉगच्या माध्यमातून इ १० वी च्या विषयासंदर्भात अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिका स्वरूप,प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र या विषयी राज्य मंडळातील अनुभवी तज्ञांचा सल्ला,विविध शैक्षणिक उपक्रमासंबंधी लेख व बातम्या,विषय योजना व विषयाचे मूल्यमापन या संदर्भातील शैक्षणिक परिपत्रके व शासन निर्णय तसेच शालेय स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन आपल्याला मिळू शकणार आहे.
very nice Activity
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteVery good initiatives. If needed help you can contact me. Any podcast related stuff you need you can contact me.
ReplyDeleteRegards
Dr Sunita Yadav (blogger/Teacher from Aurangabad )
Sir ji app mobile var download hot nahi pls share link in hm group of all distict
ReplyDeleteupkram khup chaan aahe abhinandan sarvanche
ReplyDeleteSir ji app mobile var download hot nahi pls share link in hm group of all distict
ReplyDelete