नमस्कार ! या शैक्षणिक ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत !****************आता मोबाईलवर MPY App उपलब्ध आहे.खाली लिंक दिली आहे.डाउनलोड करा. ***********************

Monday 15 March 2021




 

3 comments:

  1. https://mpylearningcommunity.blogspot.com/

    आज सोमवार दिनांक 15/03/2021 रोजी ZOOM मीटिंग च्या माध्यमातून महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते या सर्वांना उपयुक्त अशा *mpylearningcommunity* या
    ब्लॉग चे उदघाटन माजी शिक्षण संचालक डॉ वसंत काळपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई , पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी "शंभर दिवसात दहावी" हा मार्गदर्शक व्याख्यानांचा उपक्रम यूट्यूबच्या माध्यमातून घेण्यात आला होता व त्याचा लाभ मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सुमारे दीड लाख शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी घेतला.
    या ब्लॉगमध्ये विविध स्पर्धा परीक्षा, करियर मार्गदर्शन, विविध शालेय विषयांचे मार्गदर्शन आणि येणाऱ्या शंकांचे तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून शंकानिरसन करण्यात येणार आहे . सध्या १० वी च्या परीक्षा जवळ येत असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय तीन प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचे वेळापत्रक सोबतच देण्यात आले आहे . याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी, बातम्या, लेख, विविध कार्यक्रम आणि उपयुक्त असा इतर पूरक मजकूरसुद्धा या ब्लॉगवर देण्यात येईल.

    या उपक्रमासाठी श्री मनोहर संकपाळ आणि सहकारी यांनी अत्यंत सुंदर ब्लॉगचे डिझाइन केल्याबद्दल श्री अरुण थोरात व जे के पाटील यांनी सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचे आणि तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सदर ब्लॉगचा अवश्य वापर करुन परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आवाहन सर्व टिमतर्फे करण्यात येत आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल

      Delete
  2. blogspot सुरु केल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन सर! आ.काळपांडे सरांच्या मार्गदर्शनाने श्री.मनोहर सरांनी धडपड करून तांत्रिक बाबी सांगितल्या.मनोहर सरांचेही अभिनंदन.आपल्या या उपक्रमाने वि.ना योग्य अशी दिशा मिळणार आहे.MPY टीमचे आभार.

    ReplyDelete